महापालिका रणसंग्राम: पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच प्रभाग

Categories
PMC महाराष्ट्र
Spread the love

पुणे महापालिका निवडणूकीसाठी एकच प्रभाग

– राज्य सरकार चे आदेश जारी

पुणे – पुणे महापालिका निवडणूकीसाठी एकचा प्रभाग असणार की दोनचा असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगानेनिर्णय घेतला असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकचा प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेली आहे. राज्य सरकारने विधीमंडळात एकचा प्रभाग असणार असा कायदा पारित केला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ रोजी पुणे, मुंबई महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकेत एकचा प्रभाग असणार असे आदेश काढले होते. राज्य सरकारने एकचा प्रभाग केला असला तरी दोनचा प्रभाग होण्याची शक्यता असल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू होती.

तसेच दोनचा प्रभाग पद्धती जास्त फायदेशीर असल्याचे मत अनेक नगरसेवकांसह राजकीय पदाधिकार्यांचे मत होते. त्यासाठी विधीमंडळात कायद्यात बदल केले जातील असा अंदाज आहे वर्तावला जात होता. या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. एकचा प्रभाग झाल्याने पक्षासह उमेदवाराच्या क्षमतेचाही कस लागणार आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २००७ एकच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक झालेली होती. महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख म्हणाले, ‘शहरात एक प्रभाग एक सदस्य या पद्धतीने रचना केली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पद्धतीने रचना केली जाईल. यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो लागेल.

शहरातील लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना केली जाईल. त्यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाईल. यामध्ये एससी, एसटी व इतर जातींचा विचार केला जाईल. एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

– अजित देशमुख, निवडणूक अधिकारी, महापालिका.

Leave a Reply