लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणारांचे कार्य कौतुकास्पद!

Categories
पुणे
Spread the love

 

लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद
 -भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील.
पुणे. लसीकरणाचे कार्य खूप महत्वाचे होते जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.  हे शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून अश्यांचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरोवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.
शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग 13 मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्रात ही जबाबदारी पार पडणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सहाय्यक यांचा कौतुक समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल सावे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,नगरसेवक जयंत भावे, उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत पाटील  म्हणाले ” सुरवातीच्या काळात नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते, अल्प प्रतिसाद मिळतं होता मात्र कालांतराने नागरिकांचा लसीकरणवरील विश्वास वाढला आणि हे संकट थोपविण्यासाठी लसीकरण केले पाहिजे हे लोकांना पटले आणि मग केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. अश्या वेळीकेंद्रावर प्रत्यक्ष लसीकरण करणारे हात मौल्यवान कामगिरी बजावत असून समाजाने त्यांचे ऋण मानले पाहिजे. काही लोक म्हणतील की त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो पण पगार मिळतं असला तरी कोरोनाचा धोका सर्वांनाच समान असून त्या संकटकाळात काम करण्याचे धाडस करणाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या प्रस्ताविकात ह्या कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या केंद्र 10 वाजता उघडणार असले तरी रोज पहाटे 5:30 ला रांगेत उभे राहणारे नागरिक,ज्यांना टोकन मिळाले नाही त्यांचा संताप,अपुरा लस पुरवठा, विविध मान्यवरांचा दबाव अश्या स्थितीत काम करणे अवघड होते, तरीही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे कार्यकर्ते यांनी परिस्थिती चे भान ठेऊन संयमाने सगळेच हाताळले आणि अडथळ्यांची शर्यत पार पाडत आजपर्यंत प्रभागातील 5000 नागरिकांचे लसीकरण पार पाडले.म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी  पाटील यांच्या हस्ते नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उत्तम काम केल्याबद्दल प्रभागाच्या वतीने त्यांचा सत्कार केला, प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य ऍड मितालीताई सावळेकर यांनी मंजुश्रीताई यांना बचत गटाने शाली पासून तयार केलेले विशेष जॅकेट देऊन हा सत्कार केला.

Leave a Reply