PMC Property tax Department | 2023-24 आर्थिक वर्षात प्रॉपर्टी टॅक्स विभागाने 53 हजारांहून अधिक नवीन मिळकतीची केली नोंदणी

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Property tax Department | 2023-24 आर्थिक वर्षात प्रॉपर्टी टॅक्स विभागाने 53 हजारांहून अधिक नवीन मिळकतीची केली नोंदणी

| 130 कोटींहून अधिक महसूल मिळाला

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (Pune Municipal Corporation Property tax Department) वतीने नवीन मिळकतींचा (New Property registration) शोध घेऊन आकारणी केली जाते. यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळते. 2023-24 आर्थिक वर्षात 53 हजारांहून अधिक नवीन मिळकतीची नोंदणी करण्यात आली आहे. त्यातून विभागाला 130 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Property tax)
नवीन आकारणी केलेल्या मिळकतीमध्ये निवासी मिळकती या 47 हजार 819 आहेत. त्यातून 63 कोटी महापालिकेकडे जमा झाले आहेत. मात्र त्यातून महापालिकेला 124 कोटी मिळणे अपेक्षित होते. तसेच नवीन आकारणी केलेल्या मिळकतीमध्ये बिगर निवासी मिळकती या 5 हजार 324 इतक्या आहेत. यातून महापालिकेकडे 68 कोटी जमा झाले. महापालिकेला यातून 118 कोटी मिळणे अपेक्षित होते. (PMC Property tax)
महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाला आर्थिक वर्षात एकूण 2273 कोटी उत्पन्न मिळाले आहे. यंदा 2400 कोटी चे उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेला अजून नव्या मिळकतींचा शोध घ्यावा लागणार आहे.