FDA Appeal : उपहारगृह, रेस्टॉरंट परिसरामध्ये अन्न सुरक्षा दर्शक फलक लावणेबाबत आवाहन

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

उपहारगृह, रेस्टॉरंट परिसरामध्ये अन्न सुरक्षा दर्शक फलक लावणेबाबत आवाहन

पुणे :- उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात प्रवेशद्वाराच्या बाहेर, स्वागत कक्षाच्या ठिकाणी किंवा दिसेल अशा ठिकाणी अन्न सुरक्षा दर्शक ए-३ आकाराचे कार्डबोर्ड फलक उपहारगृहामध्ये लावणे केंद्रशासनाने बंधनकारक केलेले आहे. फलक न लावल्यास प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात अन्न सुरक्षा दर्शक फलक लावण्यात यावा, असे आवाहन अन्न व औषधप्रशासन सहआयुक्त शि.स.देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply