Bhimsen Joshi Festival : भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पुण्यामध्ये शास्त्रीय संगीत महोत्सव

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पुण्यामध्ये शास्त्रीय संगीत महोत्सव

: अमित विलासराव देशमुख, सांस्कृतिक कार्य मंत्री

: पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह अनेक दिग्गजांची सांगितिक मेजवानी.

मुंबई. : भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने दि. ९ व १० मे, २०२२ रोजी पुणे येथे शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. गणेश क्रीडा कला मंच येथे आयोजित केलेल्या या महोत्सवात; पंडित हरिप्रसाद चौरासिया, आनंद भाटे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात कला सादरीकरण करणार असल्याचेही अमित देशमुख यांनी नमूद केले आहे.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी संगीत महोत्सवाच्या पहिल्या पर्वात दि.९ मे रोजी सायं.६.०० वाजता पं.सारंगधर साठे व पं.प्रमोद गायकवाड यांची शहनाई व संवादिनी यांची जुगलबंदी सादर होणार आहे तर त्याच दिवशी सायं.७.०० वाजता विदूषी सानिया पाटणकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांचेदेखील शास्त्रीय संगीत गायन होणार आहे तर त्यादिवशी रात्री ८.३० वाजता सुप्रसिदध बासरीवादक पं.हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन सादर होईल.  महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वात म्हणजेच दि. १० मे रोजी सायं ६.०० वाजता पं.मारुती पाटील यांचे सितार वादन होईल तर तदनंतर श्रीमती शर्वरी जेमीणीस व सहकारी यांचे सायं ७.०० वाजता कथ्थक नृत्य सादरीकरण होईल. महोत्सवाची सांगता त्याच दिवशी रात्री ८.३० पं.आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे.

सर्व रसिक प्रेक्षकांसाठी हा संगीत महोत्सव विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर आसनव्यवस्था निश्चित होणार असून, तरी सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घेण्याचे श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Leave a Reply