PCMC | मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी करावी – रविराज काळे

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी  करावी – रविराज काळे

 दापोडी येथिल 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदिपात्रात सोडण्यात येत आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे.
काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गंभिर बाब म्हणजे मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगार मैला कोणत्या सुरक्षा साधनांशिवाय उचलण्याचे काम करत होते. कामगारांच्या पायात बूट नव्हते, हंडग्लोज नव्हते. हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी निकम  यांच्या समोर चालू होता. त्यांच्यासोबत ठेकेदार देखिल हजर होता परंतु त्या ठेकेदाराला बोलण्याची किंवा या सर्व चालू असलेल्या प्रकाराची विचारायची देखिल हिंमत झाली नाही.असे पालिकेचे अधिकारी काम करत आहेत.मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात आले या प्रश्नी तेथील सुपरवाईजर यांना विचारले असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरे नव्हती.
        या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदिपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे असे निदर्शनास आले.यामुळे नदिपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.संबंधित ठेकेदारामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी.संबधीत प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि आम आदमी पार्टीचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,निरज सुतार यांनी केली आहे. अन्यथा मनपा समोर आंदोलन करण्याचा इशारा देखिल दिला आहे.