Unlock : सोमवार पासून महाविद्यालये होणार सुरु  : शहराबाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र
Spread the love

सोमवार पासून महाविद्यालये होणार सुरु

शहर बाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक

पुणे : पुण्यात सोमवारपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करणार आहोत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना rtpcr बंधनकारक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधताना बोलताना होते.

पुणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जिल्ह्याबाहेरीलही विद्यार्थी विद्यापीठात येतात. त्यामुळे त्यांनी दोन डोस घेण्याबरोबरच आरटीपीसार टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना कॉलेज आणि हॉस्टेलला देण्यात आल्या आहेत.

झोपडपट्टीमध्ये लसीकरण वाढवणार 

”देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात झोपडपट्ट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे. आपण ७५ तास लसीकरण कार्यक्रम राबवला. आता झोपडपट्टीमध्ये घरोघरी लस देण्याचं प्रयत्न करणार आहोत. ” असं ही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply