PMC Schools : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली : डीबीटी च्या माध्यमातून निधी देणार

Categories
Education PMC पुणे
Spread the love

महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

: अतिरिक्त आयुक्त यांची माहिती

पुणे: राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करत माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेच्या शाळां 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मनपा शाळांमध्ये 29% उपस्थिती पाहण्यास मिळाली. त्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद वाढताना दिसतो आहे. आता ही उपस्थिती ५०% पर्यंत वाढली आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

: 8 ते 12 वी च्या शाळा सुरु

सरकारने परवानगी दिल्यानुसार राज्यभरात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा 8 वी ते 12 वी पर्यंतच्या आहेत. पुणे महापालिकेने देखील 4 ऑक्टोबर पासून आपल्या शाळा सुरु केल्या आहेत. महापालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलावले जाते. शिवाय एका बाकड्यावर एकाच विद्यार्थ्यास बसण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. पालिकेने पालकांची देखील परवानगी घेतली आहे. सुरुवातीला  महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 29.37% उपस्थिती होती. मात्र हळूहळू विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. माध्यमिक शाळामध्ये आता ही उपस्थिती ५०% पर्यंत वाढली आहे. असे अतिरिक्त आयुक्त मोळक यांनी सांगितले. अजूनही  चांगला प्रतिसाद मिळेल, असे ही मोळक म्हणाले.

साहित्य  घेण्यासाठी डीबीटी च्या माध्यमातून निधी

दरम्यान आता विद्यार्थ्याची उपस्थिती पाहता या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी डीबीटी च्या माध्यमातून निधी दिला जाईल. असे ही अतिरिक्त आयुक्त मोळक यांनी सांगितले. मोळक म्हणाले कि शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांना डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या अकाऊंट वर निधी जमा केला जातो. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे घ निधी जमा करण्यात आला नव्हता. मात्र आता शाळा चांगल्या पद्धतीने सुरु केल्या आहेत. त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. लवकरच आता निधी देण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी केली जाईल.

Leave a Reply