Barshi: वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : बार्शी तालुक्याला दिलासा

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती
Spread the love

वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे

: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

बार्शी : बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या ४८ गावांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदे. महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना दिलेले आहेत. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. नुकतीच आमदार राऊत यांनी मंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले होते.

: बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

याबाबत आमदार राऊत यांनी सांगितले कि, बार्शी तालुक्यात मागील १५  दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. तालुक्‍यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे ६ मंडलांमधील गावांमध्ये अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. परंतु अतिवृष्टीच्या निकषातील तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडलांस अतिवृष्टीतून वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन, संताप व्यक्त होत आहे. शेतकरी बांधवांच्या या संतप्त भावना व बार्शी तालुक्यातील या ४ मंडलांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती व वास्तव महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मांडले. या विषयाबाबत त्यांच्याशी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, संपूर्ण माहितीचे पत्र मंत्री महोदय यांना दिले. यावर त्यांनी तात्काळ  जिल्हाधिकारी सोलापूर यांना याबाबत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. असे ही राऊत म्हणाले.

Leave a Reply