Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | पुणे महापालिका खरेदी करणार 2500 सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस 

Categories
Breaking News Education PMC social आरोग्य देश/विदेश पुणे
Spread the love

Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | पुणे महापालिका खरेदी करणार 2500 सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस

| पहिल्या टप्प्यात 9 वी तील मुलींना दिली जाणार लस

Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Pune Municipal Corporation Health Department) 2500 सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस (Cervical cancer vaccines) खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका शाळांतील (PMC School) आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही लस नववीच्या मुलींना दिली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे (Dr Rajesh Dighe PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)

 

याबाबत डॉ दिघे यांनी सांगितले कि, आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी आहे. दोन वर्षासाठी लस या माध्यमातून घेण्यात येणार आहे. लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नववीतील आणि त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार आहे. डॉ दिघे यांनी सांगितले कि, मार्च चा शेवटचा आठवडा किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे लसीकरण केले जाईल. (Pune PMC News) 

 

सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? 

 

मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण, हळूहळू शरीरातून पांढरा स्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणं असतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजेच एडेनोकार्सिनोमा.

सर्वायकल कॅन्सरची लक्षणं कोणती? 

 

    • अनियमित मासिक पाळी

 

    • वजन कमी होणे

 

    • गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे

 

    • वारंवार लघवीला होणे

 

    • छातीत जळजळ होणे

 

    • जुलाबाचा त्रास होणे

 

    • भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे

 

    • खूप जास्त थकवा जाणवणे

 

    • ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे

 

    • बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे

 

    • शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे

 

  • मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे

 

सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो? 

 

एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. तसेच, अभ्यासांत हा सर्वायकल कॅन्सर हा कौटुंबिक इतिहासामुळेही होऊ शकतो असंही आढळून आलं आहे. तसेच, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो.

‘अशी’ घ्या काळजी

 

    • जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घेणं. शरीर स्वच्छ ठेवणे.

 

    • नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे

 

    • धूम्रपानाच्या अतिसेवनानेही सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो.

 

    • सर्वायकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एचपीव्हीमुळे होतो.

 

  • सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.