Education: पुण्यात आज पासून कॉलेज, विद्यापीठ सुरु

Categories
Breaking News Education पुणे
Spread the love

पुण्यात आज पासून कॉलेज, विद्यापीठ सुरु

: विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पुणे : पुण्यात आज पासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना  rtpcr बंधनकारक असल्याची घोषणा  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार कॉलेज प्रशासनाला हा नियम पाळावा लागणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र कॉलेज सुरु झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.

: विद्येचे माहेरघर पुन्हा बहरणार

यामध्ये महाविद्यालय सोबत कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्था याचा देखील समावेश आहे. शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जिल्ह्याबाहेरीलही विद्यार्थी विद्यापीठात येतात. त्यामुळे त्यांनी दोन डोस घेण्याबरोबरच आरटीपीसार टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना कॉलेज आणि हॉस्टेलला देण्यात आल्या आहेत.  दरम्यान कॉलेज आणि क्लासेस आता सोमवार ऐवजी मंगळवार पासून सुरु झाले. कारण राज्यात महाविकास आघाडी सरकारने सोमवारी लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. त्यामुळे हा निर्णय बदलला होता. पुण्याला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते. कारण देश विदेशातून इथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. मात्र कोरोनामुळे यात खंड पडला होता. साहजिकच त्यामुळे आर्थिक घसरण देखील झाली होती. मात्र आता कॉलेज सुरु झाल्याने माहेरघर बहरणार आहे. विद्यार्थी देखील त्याचे आनंदाने स्वागत करत आहेत.

Leave a Reply