Highways: Nitin Gadkari : 22 महामार्ग प्रकल्पांचे उदघाटन करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Categories
पुणे महाराष्ट्र
Spread the love

22 महामार्ग प्रकल्पांचे उदघाटन करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.

 

 

मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भुमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर कित्येक वर्षांपासून पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. येथील नागरिकांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे मदतही मागितली होती. सरकारनं या समस्येची दखल घेऊन उड्डाणपूल उभारण्याला मान्यता दिली होती. अखेर सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.

आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाबरोबरच कात्रज चौकातील उड्डाणपुलाचं भूमिपूजन नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांच्या हस्ते होणार आहे. या उड्डाणपुलामुळे खडकवासल्यापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे.

Leave a Reply