Water cut in some areas of city : मध्यवर्ती भागात आजपासून मंगळवारपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; तर पूर्व भागात उद्या पाणी बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

मध्यवर्ती भागात आजपासून मंगळवारपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; तर पूर्व भागात उद्या पाणी बंद

पुणे : शनिवार १२/०२/२०२२ रोजी पासून मंगळवार दि. १५/०२/२०२२ पर्यंत पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीचे मुख्य पाण्याची लाईनचे मेंटेनन्स कामामुळे सदर ४ दिवसात सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय उद्या म्हणजे रविवारी शहराच्या पूर्व भागात पाणी बंद असणार आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

पाणी पुरवठा बाधित होणारा भाग :-
पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा (शनिवार दि. १२/०२/२०२२ रोजी पासून मंगळवार दि. १५/०२/२०२२ पर्यंत) दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना ४ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
: पूर्व भागात उद्या पाणी नाही
रविवार दिनांक १३/०२/२०२२ रोजी भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी भामा आसखेड प्रकल्पाचे उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील संपूर्ण भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सोमवार दिनांक १४/०२/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. 
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
-लोहगाव, विमाननगर,वडगाव भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अखत्यारीतील परिसर :-
शेरी, कलवडवस्ती, खेझेपार्क, टिंगरेनगर, येरवडा, धानोरी इ. संपूर्ण

Leave a Reply