Shivajinagar Hinjewadi metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त समन्वय अधिकारी 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त समन्वय अधिकारी

: सर्व विभागाशी करावा लागणार समन्वय

पुणे :  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन प्रकल्पाचे मार्गिकेमधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम व त्यानुषंगाने बॅरीकेटींग व तदनुषंगिक कामे चालू आहेत. या कामांची पूर्तता वेळेत पूर्ण होणेकामी तसेच पुणे मनपा, पोलीस विभाग, पी.एम.आर.डी.ए. स्मार्टसिटी, ई विभागांशी समन्वय साधनेकामी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) कुणाल खेमणार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

: महापालिका आयुक्तांचे आदेश

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे. दरम्यान या कामांची पूर्तता वेळेत पूर्ण होणेकामी तसेच पुणे मनपा, पोलीस विभाग, पी.एम.आर.डी.ए. स्मार्टसिटी, ई विभागांशी समन्वय साधनेकामी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) कुणाल खेमणार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Leave a Reply