MPCC GS : कॉंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी पुण्यातून दोन नेत्यांना संधी 

Categories
Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

कॉंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी पुण्यातून दोन नेत्यांना संधी

: संजय बालगुडे आणि अरविंद शिंदे यांना दिले पद

पुणे: कॉंग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी लागल्यापासून पार्टीत बरेच बदल केले आहेत. राज्यात जसे बदल केले होते तसेच पुण्यातही बदल करण्यात आले होते. काही  दिवसांपूर्वी पुण्याच्या शहर अध्यक्ष पदी पुन्हा एकदा रमेश बागवे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातून संजय बालगुडे, आबा बागुल, अरविंद शिंदे यांची नावे आघाडीवर होती. मात्र यातील संजय बालगुडे आणि अरविंद ‘शिंदे यांना त्याचवेळी प्रदेश सरचिटणीस पदी नेमण्यात आले होते. मात्र त्या यादीत त्यांची नावे नव्हती. मात्र आज या दोघांना हे पद देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे.

: पहिल्या यादीत का नाही दिले नाव?

महाराष्ट्र कॉंग्रेस मध्ये गेल्या काही दिवसापासून बरेच बदल करण्यात येत आहेत. आगामी महापालिका आणि त्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक पाहता कॉंग्रेस ने हे बदल केल्याची चर्चा आहे. खास करून जेव्हा नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हा पासून या बदलाला सुरुवात झाली आहे. नानांनी सर्व प्रथम जिल्हा अध्यक्ष बदलले होते. त्यासाठी बरेच दिवस मुलाखती घेण्यात येत होत्या. पुणे जिल्हा आणि शहर  अध्यक्ष पदासाठी देखील पुण्यातील बऱ्याच इच्छुकाच्या  मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या पदासाठी रमेश बागवे यांच्यासह संजय बालगुडे, अरविंद शिंदे, आबा बागुल यांची नावे आघाडीवर होती. मात्र या पदासाठी पुन्हा एकदा रमेश बागवे यांना संधी देण्यात आली होती. सोबतच शहरातील इतर नेत्यांना प्रदेश ची  वेगवेगळी पदे देण्यात आली होती.  त्याचवेळी अरविंद  शिंदे आणि संजय बालगुडे यांना प्रदेश ची पदे देण्यात आली होती. मात्र त्या यादीत या दोघांची नावे नव्हती. मात्र आता घट स्थापनेच्या  मुहूर्तावर महाराष्ट्र कॉंग्रेस ने प्रदेश उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये ‘शिंदे आणि बालगुडे यांना संधी देण्यात आली आहे.

: पिंपरी च्या शहर अध्यक्ष पदी कैलास कदम

दरम्यान पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष पदी प्रदेश कडून कैलास कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्या अगोदर तिथे सचिन साठे काम पाहत होते. मात्र साठे यांना प्रदेश च्या उपाध्यक्ष पदी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी शहरात हा बदल करण्यात आला आहे. असे कॉंग्रेस कडून सांगण्यात आले.

Leave a Reply