Scholarship for 10-12th : महापालिकेने मागवले अर्ज : 31 डिसेंबर पर्यंत मुदत

Categories
PMC पुणे
Spread the love

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

: महानगरपालिकेने मागवले अर्ज

 : 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकता

 पुणे.  दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालिकेच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 ऑक्टोबर  ते 31 डिसेंबर आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

 – विद्यार्थ्यांना फायदा होईल

  10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती योजना आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना महानगरपालिकेकडून प्रदान केली जाते.  10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 हजार आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार दिले जातात.  यासाठी खुला गट आणि मागास जातीचा गट, असे दोन गट करण्यात आले आहेत.  कुटुंबातील मुले जे स्थानिक नागरिक आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.  या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून रेशन कार्ड, मालमत्ता कर बिल, वीज बिलाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  या शिष्यवृत्तीसाठी 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे अर्ज भरता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  यासह, आपण संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply