Agreement Fee : PMC : करारनाम्याच्या मसुदा फी मध्ये 3 ते 15 पटीने वाढ!  : नागरिक आणि ठेकेदाराच्या खिशाला भुर्दंड 

Categories
PMC पुणे

करारनाम्याच्या मसुदा फी मध्ये 3 ते 15 पटीने वाढ!

: नागरिक आणि ठेकेदाराच्या खिशाला भुर्दंड

पुणे : महापालिकेची मिळकत भाड्याने देणे, नोकरी लागताना करारनामा लिहून घेणे इथपासून ते ठेकेदाराकडून करारनामा लिहून घेणे, मृत सेवकांच्या वारसा कडून बॉंड लिहून घेणे, असे विविध दस्तावेज साठी महापालिकेकडून मसुदा फी आकारली जाते. मात्र आता या दस्यातावेजासाठी नागरिक आणि ठेकेदाराच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडणार आहे. कारण या फी मध्ये ३ ते १५ पट अशी भरमसाठ वाढ करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीच्या नावाखाली स्थायी समिती ने देखील प्रशासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

: उत्पन्न वाढीच्या नावाखाली स्थायी समितीची देखील मंजुरी

स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागाकडे कामकाजासंदर्भात वेळोवेळी कायदेशीर दस्तऐवज केले जातात. दस्त ऐवजापोटी मसुदा फी आकारणी केली जाते. दस्ताऐवजाबाबत ठरविलेली मसुदा फी ही दि.१.१०.१९९१ पासुन अंमलात असुन त्यानंतर सदर मसुदा फी मध्ये वाढ झालेली नाही. सदर दस्तऐवजावरील मसुदा फी ही मनपाकडील महसुल निधीतील एक महत्वाची बाब असुन मसुदा फी वाढीमुळे उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यामुळे नागरिक आणि ठेकेदार यांच्या खिशाला मात्र चांगलाच मार बसणार आहे. कोरोना मुळे आधीच नागरिक आर्थिक संकटात आहेत. अशातच महापालिकेच्या या निर्णयाने मात्र नागरिक हैराण होणार आहेत.

: अशा प्रकारे होईल वाढ

दस्तऐवज प्रकार  अस्तित्वातील फी   प्रस्तावित  फी

अफिडेवीट               ५० रु       २०० रु

ठेकादार करारनामा     ३५० रु     २५०० रु

मनपा नोकरीत नेमणुकीत

लिहून घेण्याचा करारनामा    ३५० रु         १००० रु

मिळकत भाड्याने देणेबाबत करारनामा       ३५० रु       २५०० रु

दस्तावेज रद्द करण्यासाठी दस्तावेज  १००   रु       १५०० रु

सेवकाच्या कर्ज रोख्याचा दस्तावेज    २०० रु        २००० रु