PMC : Annabhau Sathe Auditorium : अण्णाभाऊ साठे स्मारकातील २ कोटींचे साऊंड चोरीला  : डुप्लीकेट बसवले; महापालिका गुन्हा दाखल करणार 

Categories
Breaking News PMC पुणे

अण्णाभाऊ साठे स्मारकातील २ कोटींचे साऊंड चोरीला

: डुप्लीकेट बसवले; महापालिका गुन्हा दाखल करणार

पुणे : महापालिकेच्या बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकातील २  कोटींचे साऊंड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या ठिकाणी डुप्लीकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सभेत प्रश्न मांडल्यानंतर आता महापालिका गुन्हा दाखल करणार आहे. मात्र या निमित्ताने महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरऔदितोरीम  प्रश्न उपस्थित होत आहे.

: मुख्य सभेत उपस्थित केला प्रश्न

याबाबत सोमवारच्या मुख्य सभेत स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जगताप यांनी सांगितले कि महापालिकेच्या वतीने लोकांना सांस्कृतिक सुविधा देण्यासाठी नाट्यगृहे उभारण्यात आली आहेत. त्यातच बिबवेवाडीतील अण्णाभाऊ साठे स्मारक देखील आहे. इथे देखील मोठे कार्यक्रम होतात. त्यासाठी सभागृह बनवण्यात आले आहे. मात्र यातील २  कोटींचे साऊंड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या ठिकाणी डुप्लीकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहत आहे. असे जर असेल तर तिथलेच कर्मचारी हे करतात, असे सिद्ध होत आहे. जगताप यांनी प्रशासनला याबाबत माहिती विचारली. त्यावर महापौरांनी प्रशासनाला खुलासा करण्याचे आदेश दिले. याबाबत उपायुक्त संतोष वारुळे यांनी खुलासा केला. वारुळे म्हणाले, याबाबत आपल्याला विद्युत विभागाकडून पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार आता आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.