Ram Navami 2024 In Dubai | सातासमुद्रा पार दुबईत राम नामाचा गजर आणि जयघोष!

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

Ram Navami 2024 In Dubai | सातासमुद्रा पार दुबईत राम नामाचा गजर आणि जयघोष!

 

 

Ram Navami 2024 jn Duabi – (The Karbhari News Service) – मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपार‍ी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात झाला होता. लोक राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना ‘मर्यादा पुरूषोत्तम’ असे म्हटले जाते. त्याच प्रभू श्री राम चंद्राचा जन्मोत्सव यंदा प्रथमच दुबई मधील सर्व भारतीय बांधवानी एकत्र येऊन सातासमुद्रा पार श्री राम नवमी उत्सवाचे आयोजन करून केले. (Ram Navale 2024)


‘दूर्लभं भारते जन्म’ ज्या भूमीत जन्म दुर्लभ आहे, त्या भूमीत जन्म मिळाल्यावरच तेथील महानता समजेल? म्हणून रामनवमीच्या निमित्ताने राम चरित्र समजावून ते अंगीकारण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे या अश्या संकल्पनेने श्री राम नवमी चे आखातामधील यूएई मध्ये दि. १४एप्रिल २०२4 रोजी आयोजन यंदा करण्यात आले. या भव्य आयोजनाचे हे १ ले वर्ष होते व दुबईतील ग्लॅण्डले इंटरनॅशनल स्कूल दुबई याठिकाणी करण्यात आले.

आखातात स्थायिक झालेल्या नवीन पिढीला आपल्या भारतीय दैदिपयमान, अध्यामिक व ईतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

या कार्यक्रमा अंतर्गत भारताची परंपरा, नृत्य, भजन यासारखे विविध्यपूर्ण कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले.ज्यात मराठी, गुजराती,गोवन, हिंदी, तेलगू व मल्याळम समुदायातील लोकांनी एकत्र येऊन सादरीकरण केले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

श्रीमंत ढोल ताशा पथक दुबई व श्री गणेश भजन मंडळ शारजाह यांच्या सहकार्यानी श्री राम प्रभू यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास यूएई तिल इस्ककाँन, स्वामी समर्थ मंडळ, श्री गणेश भजन मंडळ गोवा दुबई, इंटरनॅशनल सद्गुरू फौंडेशन, साधनंम ग्रुप व इतर उद्योजक व समाजसेवी संगटणानी सहकार्य केले व सागर जाधव ( एस.जे.लाईव ) यांनी हा कार्यक्रम फेसबुक लाईव माध्यमातून जगातील सर्व प्रभू राम भक्तां पर्यंत पोहोचवला.

रामायण वर आधारित विविध भाषां मधील भजन, वेशभूषा, नाट्य, केरल मधील चेंडा मेलंम व श्रीमंत ढोल ताशा पथक यूएई चे वादन हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले
वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव, विठोबा अहिरे, रमा काळे, दुर्गेश काळे, दीपा भरत व सहकारी पल्लवी बारटके, सुप्रिया, संदीप पवार, प्रशांत शिंपी, संदीप शिंपी, संतोष भस्मे, डॉ. स्वप्नील, डॉ. सीमा उपाध्याय, शिवाजी नरूने, मंदार कुलकर्णी, किशोर मुंडे, प्रवीण जोगळे, मार्तंड मांजेलकर व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य श्री राम नवमी साजरी केली व सातासमुद्रा पार राम नामाचा गजर व जयघोष केला.

 

Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

Sanskriti Marathi Mandal | Dubai | संस्कृती मराठी मंडळाच्या (Sanskriti Marathi Mandal) दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त (Second Anniversary) दुबईमध्ये ३ सप्टेंबर रोजी खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ (Khel Paithnicha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (Sanskriti Marathi Mandal | Dubai)
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर श्री चंद्रशेखर जाधव, श्री अभिजित देशमुख, श्री सचिन कदम, श्री नितीन जाधव, सौ ज्योती सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.
पैठणीच्या खेळासाठी एकूण ६१ महिलांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. दुपारी दोन वाजता सुरु झालेली स्पर्धा संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. चमचा लिंबू, फुगा फुगवून खुर्चीत फोडणे, तळ्यात मळ्यात, फूग्याने  पेपर कप जमा करणे, स्ट्रॉ च्या साहाय्याने थर्माकोल चे गोळे जमा करणे अशा प्रकारचे वेगवेगळे वैयक्तीक खेळ घेऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यात आले.

अंतिम फेरीत पोहचलेल्या पाच महिला स्पर्धकांमध्ये झालेल्या स्पर्धेत  सौ. शितल ढमाले कदम यांना मानाची पैठणी पेशवा रेस्टॉरंट च्या संचालिका सौ. श्रेया जोशी यांच्या हस्ते देण्यात आली. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सौ. रश्मी साळुंखे यांना यास गोल्ड चे संचालक श्री. सचिन कदम यांच्या हस्ते सोन्याची नथ देण्यात आली. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सौ. माधुरी पाटिल यांना Re Take च्या संचालिका सौ. प्रिया चिल्लाळ यांच्या हस्ते iPad देण्यात आला. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी सौ. अर्चना बोंडगे यांना ग्रीन प्रिफॅब च्या संचालिका सौ.  रेखा घोरपडे आणि वेदाज टेक्निकल सर्व्हिसेस च्या संचालिका सौ. जाई सुर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी सौ. प्रियंका डांगरे यांना ईलाईट ग्रुप चे भागिदार श्री. संदिप पवार यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाला पेशवा रेस्टॉरंट, यास गोल्ड, Re Take, अल माहीर प्रिंटिंग, मीना ज्वेलर्स, अकिरा ट्रॅव्हल्स, एवेन्यू पर्ल इव्हेंट, फोकस ऑटो, डॉ. नरेंद्र मुरपाणी, डे मेरिडियन, ग्रीन प्रीफॅब, अर्पण फ्लॉवर्स, मुंबई अरोमा, टेसला प्रॉपर्टीज, जेकेव्ही, क्षण फोटोज, डीजे निकिन हे प्रायोजक म्हणून लाभले.
सौ. ज्योती सावंत, सौ. दिपाली डाके, सौ. भाग्यश्री वेंगुर्लेकर, सौ. ज्योती चव्हाण यांनी कार्यक्रमाचे यू ट्यूब प्रसारण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ श्री मंदार कुलकर्णी, श्री. किशोर मुंढे, श्री मनोज बागल, श्री. अमित मोरे आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी हातभार लावला.
—-
News Title | Sanskriti Marathi Mandal | Dubai | Spontaneous response of women in Dubai to Khel Paithani program