MPSC Exam pattern | MPSC चा मोठा निर्णय | मुख्य परीक्षा पद्धतीत बदल 

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

MPSC चा मोठा निर्णय | मुख्य परीक्षा पद्धतीत बदल

राज्यसेवा मुख्य परीक्षा (State Service Main Examination) वर्णनात्मक लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission-MPSC) घेण्यात आला आहे. ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी केला होता. सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येत आहे. तसेच, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू असणार आहे.

आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने (MPSC) घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल असं सांगण्यात येत आहे.