Hemant Bagul : सहकारनगर मध्ये सांस्कृतिक दिवाळी! : आधार सेवा केंद्राचा उपक्रम 

Categories
cultural पुणे

सहकारनगर मध्ये सांस्कृतिक दिवाळी!

: आधार सेवा केंद्राचा उपक्रम

पुणे : पुण्याच्या सहकार नगर भागातील तुळशीबागवाले कॉलनी मैदानात शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक दिवाळी कार्यक्रम आधार सेवा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मधुमेह तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित (दीक्षित डायट)यांचे आरोग्यदायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असून वेटलॉस आणि मधुमेह नियंत्रण या दोन विषयावरती ते व्याख्यान देतील या वेळेस प्रश्नोत्तराचा तास होणे अपेक्षित आहे या कार्यक्रमाला काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक ७ नोव्हेंबर २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचा किशोर कुमार, मोहम्मद रफी तसेच अन्य नामांकित गायकांचा “गीतो का सफर” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्ष नेते आबा बागूल उपस्थित राहतील.

हे दोन्ही कार्यक्रम नागरीकांसाठी विनामूल्य आहेत. यावेळी कोरोनाचा प्रसार थांबल्यामुळे वातावरण पूर्ववत होत असताना कोरोना संपला नाही याची जाण घेऊन नागरिकांच्या काळजीबद्दल ही विशिष्ट निर्देश दिले जातील.

या कार्यक्रमाचे आयोजन आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत आबा बागूल यांनी केले आहे.