NCP Agitation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ची मुक निदर्शने!

Categories
Breaking News Political पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ची मुक निदर्शने

पुणे : संसदेत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापालिकेतील पुतळ्याचे होत असलेल्या अनावरण, छत्रपती शिवराय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संतापजनक विधाने करणाऱ्या राज्यपालाची या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती या सर्व घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज ससून हॉस्पिटल जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी मुक आंदोलन केले. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी काळे कपडे परिधान करून उपस्थित होते या आंदोलनस्थळी महात्मा गांधी यांची देशभक्तीपर गीते लावून या सर्व घटनांचा निषेध करण्यात आला. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. मात्र काल आम्ही फेसबुक लाइव्हद्वारे दाखवल्याप्रमाणे मेट्रोचे बहुतांश काम अपूर्ण असून, केवळ असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे हे उद्घाटन होत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या अजूनही अपूर्ण आहेत. तरीसुद्धा निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ५४ किलोमीटर पैकी अवघ्या ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे भासवत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला आहे. एकीकडे देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसताना सुद्धा केवळ उत्तर प्रदेश निवडणुका, त्या निवडणुकांचा प्रचार, आता पुन्हा पुणे महापालिकेची निवडणूक लक्षात घेता हा उद्घाटन सोहळा ही निव्वळ जनतेची फसवणूक सुरू असून पंतप्रधानांना निवडणुका व्यतिरिक्त कुठल्याही कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, या उद्घाटन सोहळ्यात सर्वसामान्य पुणेकरांना नाकारलेला प्रवेश, जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी जर काळे मास्क परिधान केले असतील, तर त्यांना सुद्धा बाहेर काढून देण्यात आले आहे .या गोष्टी सर्व सामान्य भारतीय म्हणून मनाला न पटणाऱ्या आहेत.

या मुक निदर्शनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जयदेवराव गायकवाड, शांतीलाल सुरतवाला, दत्तात्रय धनकवडे, राजलक्ष्मीताई भोसले, दिपक मानकर, विशाल तांबे, प्रदीप देशमुख, नंदाताई लोणकर ,चंद्रशेखर धावडे , राहूल तांबे, दिपक पोकळे सर्व सेल अध्यक्ष महिला, युवक यांसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.