SRPF Gate : Wanwadi : अखेर एस.आर.पी.एफ. चे गेट वानवडीकरांसाठी खुले

Categories
Political social पुणे

अखेर एस.आर.पी.एफ. चे गेट वानवडीकरांसाठी खुले

: प्रशांत जगताप यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : गेल्या दिड वर्षांपूर्वी काही नागरिकांनी केलेल्या कायदेशीर तक्रारींमुळे एस.आर.पी.एफ. गट क्रमांक २ मधील अलंकार लॉन्स शेजारी असणारा रस्ता प्रशासनाने गेट लावत बंद केला होता. वानवडी येथील विकासनगर, तात्या टोपे सोसायटी, जय जवान सोसायटी, एस.आर.पी.एफ. गट क्रमांक १ व २ मधील रहिवासी या सर्व रहिवासी परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व जवळच असणारा रस्ता अचानकपणे बंद झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अखेर ०५ एप्रिल रोजी मध्यरात्री हे गेट सर्वांसाठी खुले करण्यात आले.

कायदेशीरदृष्ट्या पाहिल्यास हा रस्ता गेल्या साठ वर्षांपासून वानवडी परिसरातील रहिवासी ये-जा करण्यासाठी वापरत असे, तसेच पुणे महानगरपालिका या रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम करत .असे असताना अचानकपणे काही नागरिकांच्या तक्रारींमुळे हा रस्ता बंद करण्यात आला यावेळी समस्त वानवडी परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले कोरोना चा काळ संपल्यानंतर मंत्रालय दरबारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार गृहमंत्री  दिलीपरावजी वळसे-पाटील  यांच्या खात्याचा अख्यारीत हा प्रश्न असल्याने वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या दालनात यासंदर्भात बैठका घेण्यात आल्या. अखेर गेल्या ०१ एप्रिल रोजी आदरणीय गृहमंत्री  वळसे-पाटील  यांच्या मंत्रालय येथील दालनात राज्याचे माननीय पोलीस महासंचालक रजनीश शेठ,गृहसचिव आनंदजी लिमये, जिल्हाधिकारी माननीय राजेश देशमुख साहेब ,एस आर.पी. एफ.गटाचे Adg .चिरंजीव प्रसाद,dig . बाविस्कर, एस आर.पी. एफ.क्रमांक गट २ चे कमांडंट मा.श्री.मंगेशजी शिंदे, एस आर.पी. एफ. गट क्रमांक १ चे कमांडंट मा.श्री.संदीपजी दिवाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मंत्रालय मुंबई येथे एक बैठक पार पडली. त्या बैठकीत आदरणीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या सोमवार दिनांक ०४ एप्रिल रोजी या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर पाहणी केली व सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर अखेर ०५ एप्रिल रोजी मध्यरात्री हे गेट सर्वांसाठी खुले करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, हा विजय सत्याचा असून, गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही शक्य झाले.
माझ्या वानवडीकरांसाठी अस्मितेचा, जिव्हाळ्याचा, रोज होणाऱ्या गैरसोयीचा हा विषय सोडवू शकलो, याचा निश्चित मनस्वी आनंद आहे. आदरणीय खा.शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय मा.ना.अजितदादा पवार , आदरणीय गृहमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे-पाटील साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे तसेच प्रशासनासोबत झालेल्या सातत्यपूर्ण बैठका या सर्वांमुळे आज अखेर या लढ्यास यश मिळाले.
जर रस्ता आहे, माझे वानवडीकर गेल्या साठ वर्षांपासून त्याचा वापर करत आहेत, माझी पुणे महानगरपालिका या रस्त्याचे वेळोवेळी देखभाल व दुरुस्तीचे करत आहे, तर मग वानवडीतील नागरिकांना या रस्त्यापासून वंचित कसे ठेवू शकता….? ही भावना कित्येक वेळेस स्वस्थ बसू देत नव्हती. सातत्याने जशी गृहमंत्र्यांची वेळ मिळेल तसा मी या बैठकांसाठी गृहमंत्र्यांकडे आग्रह धरत असे. सातत्याने पोलिस प्रशासनासोबत वारंवार हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामंजस्याची भूमिका स्वीकारली, हे एक गेट उघडण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न आज माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. परंतु या सगळ्या प्रयत्नांना आज आलेले यश निश्चितच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. आजपर्यंत माझ्या वानवडीला कुठल्याही सेवेपासून वंचित ठेवले नाही, जेव्हा जेव्हा कोणी अशाप्रकारे आमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हा प्रशांत जगताप ढाल बनून उभा राहिला. यापुढील काळात देखील माझ्या वानवडीकरांच्या सेवेत मी सदैव हजर राहील, हाच विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. समस्त वानवडीकरांना या  बातमीच्या शुभेच्छा देतो.