RMS : Tempo owner : त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन 

Categories
Breaking News social पुणे

त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन

पुणे : टेम्पो मालक आणि चालक यांच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली पुणे शहर व जिल्ह्यातील टेम्पो चालक मालक यांची संघटना स्थापन करण्यात आली. ज्या टेम्पो चालक मालक यांना संघटनेत सभासद व्हायचे आहे. त्यांनी काँग्रेस भवन येथील राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.

चालक आणि मालकांना नाहक त्रास

पुणे शहर आणि जिल्ह्यातील टेम्पो चालक मालक यांची संघटना कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली.

सध्या टेम्पो चालक मालक यांना फार या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विनाकारण पोलीस पावत्या फाडण्याचे काम करत आहेत. ज्या दुकानात मालाची ने- आण करतात त्यांच्याकडून पुरेसा मोबदला देण्यात येत नाही. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्या प्रमाणात भाडेवाडी मिळत नाही. अशा अनेक कारणामुळे हे सर्व टेम्पो चालक मालक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय करीत आहेत. कोविड च्या संकटामुळे बँकांचे थकीत कर्ज झाल्यामुळे त्यांचाही तगादा या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे लागला आहे. या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली पुणे शहर व जिल्ह्यातील टेम्पो चालक मालक यांची संघटना स्थापन करण्यात आली. यावेळी संघटन वाढविण्याची जबाबदारी आण्णा देवकर व राहुल शेवाळे यांना देण्यात आली. ज्या टेम्पो चालक मालक यांना संघटनेत सभासद व्हायचे आहे. त्यांनी काँग्रेस भवन येथील राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.