BJP women wing : साडे सात लाख महिला जीईएम पोर्टल द्वारे जोडण्याचे महिला मोर्चाचे उद्दिष्ट!

Categories
Political पुणे महाराष्ट्र

विद्येच्या माहेरघरात जीईएम पोर्टलचे उद्घाटन

महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. साडे सात लाख महिला जीईएम पोर्टलद्वारे जोडण्याचे महिला मोर्चाचे उद्दीष्ट आहे. संपूर्ण भारतातील महिलांना या पोर्टल चा फायदा होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल आहे. या पोर्टलशी महिलांना जोडण्याची मोहीम पुणे म्हणजेच विद्येच्या माहेरघरातून होतोय याचा जास्त आनंद होतोय. असे मत भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन लघुउद्योजिका, बचतगट, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्रीय पातळीवर ई मार्केटिंग पोर्टल विकसित करण्यात आले आहे. सदर पोर्टलला जीईएम (Government E Marketing) असे नाव देण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वनाथी श्रीनिवासनजी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळ पोर्टलच्या राष्ट्रीय प्रभारी सुखप्रीत कौर, महाराष्ट्र गोवा प्रभारी उपाध्यक्षा ज्योतीबेन पंड्या, सरचिटणीस दीप्ती रावत, उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पुणे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक, शहराध्यक्षा अर्चना पाटील, वर्षा डहाळे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर महिला आघाडी व उषाताई वाजपेयी यांनी केले होते.