PMC : Vigilence Awareness week : बंद दाराआड घ्यावी लागली भष्ट्राचार निर्मूलनाची शपथ! 

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

बंद दाराआड घ्यावी लागली भष्ट्राचार निर्मूलनाची शपथ!

: महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी

पुणे: महापालिकेचे कामकाज प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली जाते. यावर्षी 28 ऑक्टोबर ला हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षी महापालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर याचे आयोजन केले जाते. मात्र याच वेळी काही राजकीय पक्षांनी महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. विरोधी पक्षाचा हा अभिनिवेश पाहून मात्र मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे हा कार्यक्रम प्रांगणात पार न पाडता महापालिकेच्या जुन्या सभागृहात घेण्यात आला. मात्र या विरोधाभासाची पालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.

: दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह

राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilence Awareness week) चे आयोजन केले जाते. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह राज्य सरकारच्या आदेशानुसार आयोजित केला जातो. महापालिकेत देखील हा सप्ताह आयोजित करून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे कामकाज प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली जाते. यावर्षी 28 ऑक्टोबर ला हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षी महापालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर याचे आयोजन केले जाते. मात्र याच वेळी काही राजकीय पक्षांनी महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपाच्या विरोधात भ्रष्ट भस्मासुराचा अंत करण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन पुकारले होते. विरोधी पक्षाचा हा अभिनिवेश पाहून मात्र मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे आयुक्त किंवा प्रशासनातील कुणी प्रांगणात येऊ शकले नाही. यामुळे हा कार्यक्रम प्रांगणात पार न पाडता महापालिकेच्या जुन्या सभागृहात घेण्यात आला.  सभागृह नेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपमहापौर यांनी सर्वांना शपथ दिली.

: अशी घेतली जाते प्रतिज्ञा

• जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन.
• लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही.
• सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन.
• जनहितासाठी कार्य करेन.
• व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन.
• भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन.