Bharat Sasane | सत्य व असत्य यातील भेद समाजाला निर्भिडपणे दाखवण्याची जबाबदारी  लेखक, कलावंतांनी स्वीकारावी | मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural social पुणे
Spread the love

सत्य व असत्य यातील भेद समाजाला निर्भिडपणे दाखवण्याची जबाबदारी  लेखक, कलावंतांनी स्वीकारावी

| मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे प्रतिपादन

पुणे | ‘ देश संभ्रमित व गोंधळलेल्या अवस्थेत असताना लेखक, कलावंतांनी या विरोधात स्पष्ट भूमिका घेऊन आवाज उठवला पाहिजे. सत्य व असत्य यातील भेद समाजाला निर्भिडपणे दाखवण्याची जबाबदारी ही लेखक कलावंतांनी स्वीकारावी’ असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. ते दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे 384वे पुष्पगुंतांना… बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ‘देशातील नागरिकांचे बेरोजगारी, महागाई यांसारख्या प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण जनतेला भ्रमिष्ट करुन जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत ही शोकांतिका असून याविरोधात सामुहिक लढा उभारला गेला पाहिजे. आणि म्हणूनच माणूसकेंद्री साहित्य लेखन आवश्यक आहे. साहित्यिक प्रवाहाच्या विरुद्ध एकजुट करतील तरच देशातील संभ्रमित आणि गोंधळलेली अवस्था नष्ट करता येईल.’

अध्यक्षीय भाषणात दादासाहेब सोनवणे म्हणाले की, ‘क्रांतीची सुरुवात साहित्यातून होते म्हणून दलित स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा जोपासत असताना निर्भिड साहित्यिकांचा अभिमान वाटतो. साहित्यिकांच्या अभिव्यक्तीचा आदर करुन त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे.

कार्यक्रमाची सुरुवात सनई वादन शंकर नारायण कसबे आणि रिठे मास्टर तसेच शाहीर सदाशिव भिसे आणि नकूसाताई लोखंडे यांच्या गीताने झाली. संविधान उद्देशिका डॉक्टर सुहास नाईक यांनी सामूहिक वाचन केले. प्रस्ताविक संघ प्रमुख राजू धडे यांनी केले.आभार साहेबराव खंडाळे यांनी मांडले. सदर प्रसंगी साहित्यिक बाळ भारस्कर, सुरेश पाटोळे, डॉ मधुकर खेतमाळस,श्रीमती सुभा आत्माराम लोंढे,समाज कल्याण अधिकारी अशोक खंदारे,हनुमंत क्षीरसागर, डॉ. खुणे त्रिभुवन ,श्री व सौ दिपिका खोतकर, प्रा. दिलीप लोखंडे, प्रा सुहास नाईक, प्रा, विनोद सूर्यवंशी, सचिन जोगदंड, शहर प्रमुख संतोष माने,संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण लोंढे, महिला आघाडी प्रमुख कलावती तुपसुंदर ,अरुणा ठाकूर, श्री सौ नितीन घोलप, श्री व सौ अण्णा राजेंद्र शेंडगे, डॉ. नारायण डोलारे, राजाभाऊ दोडके, बापूसाहेब पाटोळे,दिपक जवंजाळे,संजय केंदळे,श्याम चंदनशिव हे उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.