The Kashmir Files : Vivek Agnihotri : ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला Y दर्जाची सुरक्षा

Categories
Breaking News cultural social देश/विदेश
Spread the love

‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला Y दर्जाची सुरक्षा

: केंद्र सरकारचा निर्णय

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990 च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे.

 

एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले असून त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान CRPF कडून त्यांचं रक्षण केलं जाणार आहे.‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळविवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ रिलीजच्या 6 व्या दिवशी, चित्रपटानं 19.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 79.25 कोटी रुपये आहे.

Leave a Reply