PMC Hawker’s Policy | 9852 पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Hawker’s Policy | 9852 पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेने पुर्नवसन केलेल्या 12113 पैकी 9852 पथारी व्यावसायीकांनी 2018 पासून महापालिकेचे 56 कोटी 17 लाख रुपये भाडे थकविले आहे. ही थकबाकी न भरल्यास महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही तसेच परवाने देखिल रद्द करण्यात येतील, असा इशारा अतिक्रमण विभागाने दिला आहे.(Pune PMC News)

महापालिकेने १२ हजार ११३ नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे. या व्यावसायीकांकडून झोननिहाय भाडे आकारण्यात येते. यापैकी तब्बल 9 हजार 852 व्यावसायीकांनी 2018 पासून महापालिकेला भाडेच दिलेले नाही. मूळ भाडे आणि थकबाकीवरील दंडाची आकारणी असे तब्बल 56 कोटी 17 लाख रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे थकलेली आहे. ही रक्कम भरली नाही तर परवाना नूतनीकरण केले जाणार नाही, प्रसंगी परवाने देखिल रद्द करण्याचा इशारा अतिक्रमण  विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिला आहे.

पथारी व्यावसायीक धोरणानुसार महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये नो हॉकर्स झोन तसेच काही महत्वाच्या रस्त्यांवरील नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे.  नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांकडून व्यावसायीक झोननुसार भाडे आकारणी करण्यात येते.  भाडे न भरल्यास दंडही आकारण्यात येतो.