Tag: PMC Encroachment/illegal construction removal Department
Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले
Pune – (The Karbhari Online) – पाषाण मुंबई पुणे महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल इ वर बांधकाम विकास विभागाचे वतीने आज पुन्हा जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.
यापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर काही दुकानदारांनी मे उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते. मात्र 23 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले . या नंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली. स्थगिती आदेश नंतर 6 दुकानदार मे. सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या मध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली.
6 पैकी 5 दुकानदारांवर या पूर्वी कारवाई करण्यात आली होती. ज्या दुकानदारावर कारवाई झाली नव्हती त्याचेवर प्रथम कारवाई करण्यात आली. 6 दुकानदारां बाबत मे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. तोपर्यंत कारवाई झाली होती. आज 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.
सदर बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे highway वर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवडय़ात समोरील बाजू कडील दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. चतुःशृंगी पोलीस ठाणे चा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल. तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊस वरही कारवाई करण्यात येणार आहे असे उप अभियंता सुनील कदम यांनी सांगितले.
यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
हिंजवडी पोलीस स्टेशन चीफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
सदर कारवाई अधीक्षक राजेश बनकर , कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ, यांनी पूर्ण केली
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!
PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
Action of Pune Municipal Corporation (PMC) on unauthorized building in Hill Top Hill Slope in Bibvewadi
PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई
PMC Illegal Construction Action | बिबवेवाडी परिसरातील हिल टॉप हिल स्लोप (Hill top hill slope bibvewadi) मध्ये येणाऱ्या अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने अखेर बुधवार रोजी कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने २९ अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Pune Municipal corporation latest news)
महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. (Pune pmc news)
बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City engineer prashant wagmare), मुख्य अभियंता युवराज देशमुख (Chief engineer yuvraj deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने सदर कारवाई योग्यरित्या पार पाडली.