PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!

PMC General Administration Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या  (PMC General Administration Department) उपायुक्त पदाची जबाबदारी उपायुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार असणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र कामकाजाच्या सोयीसाठी पाटील यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे.  महेश पाटील यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापन विभाग व दक्षता विभागाची जबाबदारी आहे. (Pune PMC News)
आता सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी प्रतिभा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रतिभा पाटील यांच्याकडे भूसंपादन व व्यवस्थापन विभाग आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदाची जबाबदारी आधीच देण्यात आली होती.

the Karbhari- PMC Circular

PMC Deputy commissioner | उपायुक्त आशा राऊत आणि प्रतिभा पाटील यांना पुणे महापालिकेत 1 वर्ष मुदतवाढ!   | राज्य सरकारकडून आदेश जारी 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Deputy commissioner | उपायुक्त आशा राऊत आणि प्रतिभा पाटील यांना पुणे महापालिकेत 1 वर्ष मुदतवाढ!

| राज्य सरकारकडून आदेश जारी

पुणे – (The Karbhari News Service) – PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) प्रतिनियुक्ती वर आलेल्या  उपायुक्त आशा राऊत (Asha Raut PMC) आणि प्रतिभा पाटील (Pratibha Patil PMC) यांना पुणे महापालिकेत 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation Latest News)
उपायुक्त पाटील आणि राऊत यांना पुणे महापालिकेत 8 सप्टेंबर 2021 ला प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती दोन वर्षासाठी होती. त्यांचा कालावधी संपून गेला आहे. तरी त्यांची बदली झाली नव्हती किंवा मुदतवाढ दिली नव्हती. अखेर आज सरकार कडून 1 वर्ष मुदतवाढीचे आदेश आले आहेत. त्यानुसार ही मुदतवाढ 8 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. मात्र सरकारला गरज वाटल्यास मुदतीपूर्वी बदली केली जाऊ शकते. असे सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. (Pune PMC News)
दरम्यान पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या (PMC Security Department) मुख्य सुरक्षा अधिकारी (PMC Chief Security Officer) पदाची जबाबदारी उपायुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार आहे.  मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार या आधी उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. माधव जगताप यांच्याकडे मूळ जबाबदारी ही अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची आहे. नुकताच जगताप यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. कारण अजित देशमुख यांची सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्य सुरक्षा अधिकारी पदाची जबाबदारी प्रशासनाकडून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे भूसंपादन व व्यवस्थापन विभागाची देखील जबाबदारी आहे.
The Karbhari - Pratibha Patil PMC
पुणे महापालिकेच्या (PMC Pune) परिमंडळ तीन च्या उपायुक्तपदी आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांची नेमणूक आहे. राऊत या पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) उपायुक्त होत्या.
The Karbhari - PMC Asha Raut

Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

Categories
PMC पुणे

 Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

 PMC Chief Security Officer |  PMC Deputy Commissioner Pratibha Patil has been given the charge of PMC Chief Security Officer of Pune Municipal Corporation’s Security Department.  Patil will have this additional charge.  The Municipal Additional Commissioner has recently issued orders in this regard.  (Pune Municipal Corporation (PMC)
 The additional charge of the post of Chief Security Officer was earlier given to Deputy Commissioner Madhav Jagtap (PMC).  Madhav Jagtap has the basic responsibility of Encroachment and Unauthorized Construction Eradication Department.  Recently, Jagtap has been given additional charge of taxation and tax collection department.  Because Ajit Deshmukh has been transferred by the government.  Therefore, now the responsibility of the post of Chief Security Officer has been entrusted to Deputy Commissioner Pratibha Patil by the administration.  Patil currently has the responsibility of Land Acquisition and Management Department.

PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे! 

Categories
Uncategorized

PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!

PMC Chief Security Officer | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या (PMC Security Department) मुख्य सुरक्षा अधिकारी (PMC Chief Security Officer) पदाची जबाबदारी उपायुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार असणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार या आधी उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. माधव जगताप यांच्याकडे मूळ जबाबदारी ही अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची आहे. नुकताच जगताप यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. कारण अजित देशमुख यांची सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्य सुरक्षा अधिकारी पदाची जबाबदारी प्रशासनाकडून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे सद्यस्थितीत भूसंपादन व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे.
The karbhari - PMC Circular