मिळकत वाटप नियमावली 2008 मध्ये महापालिका करणार सुधारणा! : 5 लोकांची समिती गठीत : 30 सप्टेंबर पर्यंत प्रारूप तयार करण्याचे निर्देश

Categories
PMC पुणे
Spread the love

मिळकत वाटप नियमावली 2008 मध्ये महापालिका करणार सुधारणा!

: 5 लोकांची समिती गठीत

: 30 सप्टेंबर पर्यंत प्रारूप तयार करण्याचे निर्देश

पुणे: महापालिकेच्या मोकळ्या जागा, बांधीव मिळकती, अल्प शिवाय दीर्घ मुदतीने भाडे तत्वावर दिल्या जातात. त्यासाठी महापालिका मिळकत वाटप नियमावली 2008 चा आधार घेतला जातो. मात्र या नियमावलीत महापालिका सुधारणा करणार आहे. गेल्या 12 वर्षात यामध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने यामध्ये सुधारणा करण्यासाठी 5 लोकांची समिती गठीत केली आहे. या समितीला सुधारित मसुदा 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिले आहेत.

: 12 वर्षात बरेच बदल झाले

पुणे महानगरपालिका मिळकत/जागा वाटप नियमावली २००८
ही पुणे महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा व बांधीव मिळकती अल्प मुदतीने, दीर्घ मुदतीसाठी भाडे कराराने भाडे/ प्रिमीअम आकारून देण्यात येतात. सदर मिळकतींचे विनीयोगाकारीता पुणे महानगरपालिका मिळकत/जागा वाटप नियमावली २००८  राज्य शासनाचे मंजुरीने लागू करण्यात आली आहे. त्यानुमार सर्व मिळकतींचे विनियोगाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि, नव्याने प्रसृत झालेल्या शासन निर्णयातील निर्देशीत सूचनांनुसार तसेच गेल्या १२ वर्षातील विविध आदेश, शासकीय परिपत्रके, वित्तीय संस्थांचे बदलते व्याज दर, जागांचे वाढते दर, बदलती परिस्थिती हे सर्व
विचारात घेता मिळकत वाटप नियमावलीमध्ये नव्याने काही तरतूदी समाविष्ठ करणे, काही कमी करणे तसेच काही सुधारित करणे आवश्यक आहे.  तसेच प्रचलित भाडे व प्रिमीअम मुल्यांकनाच्या आकारणीमध्ये सुधारणा व अन्य
आवश्यक सुधारणा करणेदेखील आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका मिळकत वाटप नियमावली २००८ मध्ये सुधारणा करण्याकरीता 5 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या  समितीने पुणे महानगरपालिका मिळकत वाटप नियमावली २००८ मध्ये आवश्यक असणा-या सुधारणांचा प्रारूप मसुदा  ३० सप्टेंबर पर्यंत पर्यत तयार करून सादर करण्याचे निर्देश उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिले आहेत.

– अशी असेल समिती.

१. मुकुंद बर्वे –  महापालिका सहाय्यक आयुक्त
२. जयवंत पवार – उप अभियंता
३. धनाजी घागरे – कनिष्ठ अभियंता
४. अजित सणस – कनिष्ठ अभियंता
५. चंद्रकांत सोनवणे – मेंटेनन्स सर्वेअर

Leave a Reply