वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना! : वर्षभरापासून पद रिक्तच : नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना

Categories
PMC पुणे
Spread the love
वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना!
: वर्षभरापासून पद रिक्तच
: नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना
पुणे.  नगरसचिव सुनील पारखी मागील वर्षी 30 ऑगस्ट निवृत्त झाले आहेत.  तसेच उपनगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत.  त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  तसेच ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.  त्यामध्ये 29 लोक पात्र ठरले.  पात्र उमेदवारांच्या मुलाखती 18 आणि 19 मार्च रोजी घेण्यात आल्या.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नाही, या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.  त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. एक वर्ष पूर्ण होऊन देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. याबाबत महापालिकेची उदासीनता लक्षात येत आहे.
 – भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली
 नगरसचिवांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार  भरतीसंदर्भातील प्रक्रिया जलद करण्यात आली होती.  त्याची जाहिरात काढण्यात आली.  ही नियुक्ती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. इच्छुक लोकांना 11 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ देण्यात आली होती.  या पदासाठी महानगरपालिकेत 5 वर्ष नोकरीचा अनुभव, कायदा शाखेतील पदवी आवश्यक आहे.  या कालावधीत महापालिकेकडे एकूण 42 अर्ज आले होते.  यातील बहुतांश अर्ज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे होते.   अर्ज तपासल्यानंतर 29 लोक त्यात पात्र ठरले.  पात्र उमेदवारांच्या मुलाखती 18 आणि 19 मार्च रोजी घेण्यात आल्या.  परंतु नंतर ही प्रक्रिया अनेक दिवस पुढे जाऊ शकली नाही.  त्यानंतर ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. यासाठी 29 पैकी एकाही उमेदवाराला नगरसचिवाच्या  कामकाजाची माहिती नाही.  यामुळे, आता एक नवीन प्रक्रिया राबवली जाईल. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. एक वर्ष पूर्ण होऊन देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. याबाबत महापालिकेची उदासीनता लक्षात येत आहे. सध्या प्रभारी नगरसचिव म्हणून शिवाजी दौंडकर काम पाहत आहेत.
नगरसचिव  पद महत्वाचे
 महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे.  महापालिका आयुक्तांनंतर नगरसचिव हे पद महत्त्वाचे आहे.  प्रशासनाच्या तसेच महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते.  महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात.   महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.  असे असूनही नवीन नगरसचिव  प्रक्रियेला गती दिली जात नाही.  कारण नगरसचिव पारखी मागील वर्षी ऑगस्टच्या अखेरीस निवृत्त झाले आहेत.  त्यांची जागा उप नगरसचिव राजेंद्र शेवाळे घेऊ शकले असते, पण शेवाळे सप्टेंबरमध्ये निवृत्तही झाले.  त्यामुळे नगरसचिव  नियुक्तीची प्रक्रिया आधीच करणे आवश्यक होते.  पण प्रशासनाने हे केले नाही.

Leave a Reply