विद्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी : विभागीय सचिव अनुराधा ओक यांचे प्रतिपादन : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Categories
पुणे
Spread the love

विद्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी

: विभागीय सचिव अनुराधा ओक यांचे प्रतिपादन

: गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे:  कोरोना काळात शिक्षका शिवाय यश संपादन करणारे विद्यार्थी हे देशाचा नवीन इतिहास घडवणारी नवीन पिढी म्हणावे लागेल. गेले दीड वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहे. यामध्ये अनेक शाळा, विद्यालय बंद ठेवण्यात आले यामुळे सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांची ताटातूट झाली आणि ऑनलाईन शिक्षण घेण्याचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागला. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांण शिवाय विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. यामध्ये सर्वांनीच भरभरून यश संपादन केले, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे खरोखरच जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. त्यांनी दाखविलेल्या जिद्दीला, मेहनतीला मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी व्यक्त केले.

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा उपक्रम

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक व शिक्षण समितीचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये 80 टक्के च्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती मिळते. बाणेर बालेवाडी या परिसरातील सर्वात अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवितात याचा खरंच मला अभिमान आहे, आज पर्यंत बाणेर बालेवाडी या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत होतो परंतु आता पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील गौरव करताना आज मला खूप मोठा अभिमान वाटत आहे. असे मत चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केले.
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , प्रभाग क्र. ९, बाणेर- बालेवाडी – सुस – म्हाळुंगे  यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता १० वी व १२ वी तील ” गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ” झाला.  या कार्यक्रमाचे आयोजन बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाणेर – बालेवाडी- सुस- म्हाळुंगे या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी तील सुमारे ७५९ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले .
             या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक , पुणे महानगरपालिका शिक्षण समितीचे सदस्य बाबुराव  चांदेरे व डॉ. सागर बालवडकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन पुनम विधाते आणि सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी केले.

Leave a Reply