शहर काँग्रेस अध्यक्ष पदी पुन्हा एकदा रमेश बागवे – प्रदेश कार्यकारिणीत पुण्याच्या 7 लोकांना स्थान

Categories
पुणे महाराष्ट्र
Spread the love

शहर काँग्रेस अध्यक्ष पदी पुन्हा एकदा रमेश बागवे

– प्रदेश कार्यकारिणीत पुण्याच्या 7 लोकांना स्थान

पुणे : पुणे शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत काँग्रेस मध्ये बऱ्याच दिवसांपासून खलबते सुरु होती. यामध्ये अरविंद शिंदे, आबा बागुल, संजय बालगुडे, यांची नावे आघाडीवर होती. मात्र काँग्रेस कडून या पदावर रमेश बागवे यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आता थांबली आहे. बागवे यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष आता निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. रात्री उशिरा प्रदेश कार्यकारिणीची जाहीर झाली.

बरेच जण होते इच्छुक

शहर काँग्रेस मध्ये बऱ्याच दिवसांपासून अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरु होती. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यासाठी नेत्यांची मुलाखती देखील घेतल्या होत्या. शिवाय या सर्वांच्या कारभारावर लक्ष देखील ठेवले जात होते. शहरात या पदासाठी अरविंद शिंदे, रमेश बागवे, महापालिका गटनेते आबा बागुल, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अशी नावे चर्चेत होती. मात्र प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरून रमेश बागवे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या लोकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

 जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पुण्यातील सात जणांना स्थान मिळाले आहे. यात कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची तर सरचिटणीसपदी अभय छाजेड, रोहित टिळक आणि वीरेंद्र किराड यांची नियुक्ती झाली आहे. गोपाळ तिवारी आणि दीप्ती चवधरी यांची चिटणीस म्हणून संधी मिळाली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड झाली आहे.

Leave a Reply