Congress movement : inflation : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून मोदी सरकारने जनतेला दिवाळीची भेट दिली – रमेश बागवे  

Categories
Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

 जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून मोदी सरकारने जनतेला दिवाळीची भेट दिली – रमेश बागवे

 

पुणे –  केंद्रातील मोदी सरकारच्या पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली सेवन लव्हस्‌ चौक, शंकरशेठ रोड, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महापालिकेचे गटनेते आबा बागुल, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, रजनी त्रिभुवन,  व इतर मान्यवर उपस्थित होते.

चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त

    महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे गाडी चालविणे सामान्य नागरिकाच्या खिशाला न परवडणारे आहे त्यामुळे गाडी विकणे आहे असा फलक लावून गाड्यांना व स्वयंपाक गॅसला हार घालून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला.

     यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘ऐन सणासुदीच्या काळात या मोदी सरकारने इंधन व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून गोरगरीब, कष्टकरी व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाववाढीच्या विरूध्द जनता संताप व्यक्त करीत असताना सुध्दा पंतप्रधान मोदींना त्याचे गांभीर्य कळत नाही. इंधन व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून त्यांनी जनतेला दिवाळीची भेट दिली आहे. ही दिवाळी महागाईची दिवाळी म्हणून साजरी करावी लागणार आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने या दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत कमी करावी अन्यथा काँग्रेस पक्षाला जनतेच्या हितासाठी उग्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.’’

     यानंतर आपला रोष व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘मोदी सरकारच्या राजवटीत विमानाला लागणारे इंधनाचा दर ७९ रू. आहे आणि सामान्य नागरिकांच्या गाड्यांना लागणाऱ्या पेट्रोलचा दर १११ रू. व डिझेलचे दर १०४ रू. आहे. स्वयंपाक गॅसची किंमत १००० रू. पर्यंत पोहचली आहे. गेल्या मे २०२० ला स्वयंपाक गॅसची सबसिडी कोणाला न सांगता मोदी सरकारने बंद केली आहे. त्यामुळे या सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत विचार करण्यास वेळ मिळत नाही. अच्छे दिनची घोषणा करून जनतेची फसवणूक करून मोदी सरकार कारभार करीत आहे. भाजप सरकारच्या दिशाहीन कारभाराला जनता योग्य वेळी धडा शिकवेल या बाबतीत शंका नाही.’’

      या आंदोलनात नीता रजपूत, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, सुरेखा खंडागळे, भिमराव पाटोळे, मेहबुब शेख, सुनिल पंडित, द. स. पोळेकर, शिलार रतनगिरी, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, रमेश सकट, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, राजेंद्र पडवळ, विठ्ठल थोरात, सौरभ अमराळे, निलेश सांगळे, दिपक ओव्हाळ, ॲड. शाबिर खान, वाल्मिक जगताप, विजय वारभुवन, दयानंद अडागळे, यासीर बागवे, रवि पाटोळे, दत्ता पोळ, विनय ढेरे, मीरा शिंदे, शर्वरी गोतारणे, सुंदरा ओव्हाळ, राजश्री अडसुळ, ज्योती परदेशी, संदिप मोकाटे, भरत सुराणा, चेतन आगरवाल, रमाकांत साठे, विठ्ठल गायकवाड, लतेंद्र भिंगारे, राजू गायकवाड व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply