Lok Adalat : PMC : राष्ट्रीय लोक अदालतीमधून ८ कोटी ६४ लाख जमा  : मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांची माहिती 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

राष्ट्रीय लोक अदालतीमधून ८ कोटी ६४ लाख जमा

: मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांची माहिती

पुणे :  पुणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ८ कोटी ६४ लाख ७७ हजार १०६ रक्कम रुपये (८,६४,७७,१०६ ) जमा करण्यात आले. अशी माहिती मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.

 

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.पुणे महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पाणीपुरवठा विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून रक्कम रुपये ८७ लाख ६६ हजार ६६५ , मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून ३१ लाख २९ हजार १९७, कर आकारणी व कर संकलन विभागाकडील प्रलंबित प्रकरणां मधून तीन कोटी ६८ लाख ५३ हजार ९६४ रुपये, तसेच ३ कोटी ६१ लाख ७२ हजार ६८०, रक्कम रुपयांचे १४ धनादेश जमा झाले , तसेच परवाना आकाश चिन्ह विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून १५ लाख ०८ हजार ८०० रुपये रक्कम जमा झाली.

या सर्व विभागांकडून १०,६२४ नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी आज ७३४ प्रकरणे निकालात काढण्यात आली व ८ कोटी ६४ लाख ७७ हजार १०६ रुपये इतकी रक्कम जमा झाली. याप्रसंगी पुणे महानगरपालिका न्यायालयाचे मा.न्यायाधीश ए. बी. तहसीलदार,  निवृत्त न्यायाधीश व्ही. व्ही. सोनवणे यांचे पॅनेल, तसेच  उपायुक्त सामान्य प्रशासन राजेंद्र मुठे,  कर आकारणी कर संकलन प्रमुख  विलास कानडे,  मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण, अनिरुद्ध पावसकर,  विजय लांडगे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply