गुरुवारी लष्कर भागात पाणीपुरवठा बंद!
पुणे : गुरूवार रोजी लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठाबंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
2 replies on “Pune : PMC : नागरिकांना सूचना : गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद”
Good
Thank you… for appreciating and giving your precious time..!