PMC Colonies : Dheeraj Ghate : महापालिका सेवकांची घरभाडे वाढ मागे…! : माझ्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान : धीरज घाटे 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

महापालिका सेवकांची घरभाडे वाढ मागे…!

: माझ्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान : धीरज घाटे

पुणे : सातवा वेतन आयोगाची वाढ लागू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेत(Pune Municipal Corporation) काम करणाऱ्या सेवकांच्या(PMC Employees) घरभाड्यात मोठी वाढ झाली होती. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यात चतुर्थ श्रेणी सेवकांचा प्रामुख्याने समावेश होता. वास्तविक पाहता, कर्मचारी राहतात त्या वसाहतींची दुरवस्था आहे. अनेक इमारती आणि घरे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे नादुरुस्त किंवा मोडकळीस आलेली घरे आणि भाडे मात्र, बाजारभावाप्रमाणे. यामुळे सर्व कर्मचारी नाराज होते. त्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे धाव घेतली आणि मदतीची अपेक्षा के. त्यानुसार विषय लावून धरला आणि स्थायी समिती व मुख्य सभेने हा विषय मंजूर केला आहे. अशी माहिती नगरसेवक धीरज घाटे यांनी दिली.

घाटे म्हणाले, मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार यांची भेट घेतली आणि सेवकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी केली. आयुक्त साहेबांनी प्रत्यक्षात इमारतीची पाहणी करावी आणि सेवकांच्या घरांची परिस्थिती पहावी. ज्या प्रमाणात भाडे आकारले जाते, त्या प्रमाणात घराची स्थिती आहे का? पुरेश्या सुविधा आहे का? याची खात्री करून घ्यावी. आणि आपण यामध्ये लक्ष घालून पुणे मनपातील सेवकांचे वाढलेले घर भाडे हे पूर्वीप्रमाणे किंवा कमी घरभाडे आकारावे, अशी विनंती करणारे पत्र आयुक्त यांना  दिले. त्यांनीही याचा गांभीर्याने विचार करतो, असे आश्वासन दिले.

 

आज सर्वसाधारण सभेतही (जीबी) या विषयाला संमती मिळाली असून, पालिका सेवकांच्या घरभाड्याच्या वाढीचा मुद्दा निकाली निघाला. आता महानगरपालिका सेवकांचे घरभाडे पूर्वीप्रमाणेच असणार आहे. वाढीव भाडे वसुली होणार नाही. माझ्या प्रभागात महानगरपालिकेच्या दोन वसाहती आहेत. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती मला माहिती आहे. त्यामुळेच मी हा मुद्दा लावून धरला आणि आयुक्त  तसेच सर्वसाधारण सभेने सहानुभूतीपूर्वक विचार करून माझी भूमिका मान्य केली. महापालिका सेवकांना यामुळे दिलासा मिळाला आहे, याचे मला समाधान आहे. असे ही घाटे म्हणाले.

Leave a Reply