Bhaiyyasaheb Jadhav | NCP Pune | न्यायाधीश राहिलेला आणि कायद्याची चांगली जाण असलेला पुणे राष्ट्रवादीचा प्रवक्ता

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Bhaiyyasaheb Jadhav | NCP Pune | न्यायाधीश राहिलेला आणि कायद्याची चांगली जाण असलेला पुणे राष्ट्रवादीचा प्रवक्ता

| पुणे महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे भैयासाहेब जाधव सलग दुसऱ्यांदा प्रवक्ते

Bhaiyyasaheb Jadhav | NCP Pune | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे आणि न्यायाधीश राहिलेले भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav)  यांची पुणे शहर राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी (NCP Pune Spokesperson) सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच पक्षाने त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आहे. (Bhaiyyasaheb Jadhav | NCP Pune)
भैयासाहेब जाधव यांना पूर्ण पुणे शहर हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखते. जाधव यांनी महापालिकेत (PMC Pune) काम करताना पदोपदी आपल्या कायद्याच्या ज्ञानाने लोकांची मने जिंकली आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देखील मिळवून दिला. तसेच महापालिकेचे होणारे नुकसान देखील टाळले. यामुळे फक्त राष्ट्रवादीच नाही तर सर्वच पक्षात त्यांचा आदर केला जातो. पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) पहिल्यांदाच कुणी नगरसेवक न्यायाधीश म्हणून काम पाहिलेला लोकांनी पाहिला. त्यामुळे साहजिकच लोकांच्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण देखील केल्या. महापालिकेतील त्यांचे काम आणि त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा आदर करत पक्षाने त्यांना 2021 साली शहराचे प्रवक्ते पद दिले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. (NCP Pune)
कोरोना काळात जाधव यांनी केलेले काम खूपच वाखाणण्याजोगे होते. लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचे प्रबोधनात्मक काम ते दररोज प्रभागात फिरून माईक वरून आवाज देऊन करायचे. लोकांची काळजी करणारा राजनेता अशी त्यांची कोरोना काळात ओळख झाली होती. त्यांचाच आदर्श बाकी नगरसेवकांनी घेतला. दुर्देवाने कोरोना काळात त्यांना इन्फेक्शन झालं. मात्र ते त्यातून सहजासहजी बाहेर पडले नाहीत. कारण पुढील 8 महिन्यात त्यांच्यावर वेगवेगळ्या 4 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. असं असलं तरी ते हॉस्पिटल मध्ये राहून देखील ऑनलाईन पद्धतीने लोकांच्या संपर्कात राहून लोकांना मदत करत होते. अशा काम करणाऱ्या आणि लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे न्यायाधीश राहिलेला आणि कायद्याची चांगली जाण असलेला पुणे राष्ट्रवादीचा प्रवक्ता झाला म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.
——
News Title | Bhaiyyasaheb Jadhav NCP Pune | Spokesman of Pune NCP who is a judge and well versed in law