Bill Clark : उचल रक्कम वसूल न झाल्यास बिल क्लार्क ला जबाबदार धरले जाणार  : मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

उचल रक्कम वसूल न झाल्यास बिल क्लार्क ला जबाबदार धरले जाणार

: मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आदेश

पुणे : महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी, ईद तसेच विविध सणांसाठी उचल म्हणून 10 हजार रक्कम दिली जाते. मात्र बिल क्लार्क च्या हलगर्जीपणामुळे ही रक्कम वसूल होताना दिसत नाही. आगामी काळात रक्कम वसूल न झाल्यास बिल क्लार्क ला जबाबदार धरले जाईल, असा इशारा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिला आहे. शिवाय 2021-22 चा ताळमेळ झाल्याशिवाय 2022-23 मध्ये ही उचल रक्कम दिली जाणार नाही, असा ही इशारा देण्यात आला आहे.

: मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे काय आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपद्धतीनुसार सरसकट र.रु.१०,०००/-(अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) प्रतिवर्षी आदा करून दहा समान मासिक व्याज रहित हफ्त्यामध्ये वसुली करणे मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याकडील सेवकानुसार प्रत्येकी १०,०००/- प्रमाणे खात्यास एकवट रक्कम उचल म्हणून दिली जाते. प्रत्येक सेवकाकडून १० समान हफ्त्यामध्ये वसुली करणेची जबाबदारी त्या त्या खात्याची आहे. परंतु तसे खात्याकडून होत नसल्याचे लक्षात येते. खात्यास जेवढी रक्क्म उचक दिली जाते तेवढी रक्कम रीकुब होत नसल्याचे आढळून येते. तरी सर्व खात्यांना असे सूचना करण्यात येते कि, मागील वर्षी जेवढी रक्कम खात्यास उचल म्हणून प्राप्त झाली आहे तेवढी रक्क्म रीकुब झाल्याचा ताळमेळ (सेवक निहाय) मुख्यलेखा व वित्त विभागास दिल्याशिवाय पुढील वर्षी त्या खात्यास सणासाठी उचल रक्कम दिली जाणार नाही. यासाठी सर्वस्वी खाते व खात्याचा विलक्लार्क जबाबदार असेल. तरी सर्व खात्यांनी सणासाठी उचल सन २०२१-२०२२ चा ताळमेळ (सेवक निहाय) घेऊन मुख्यालेखा व वित्त विभागाकडे पाठवावे. त्याशिवाय सन २०२२-२०२३ सणासाठी उचल रक्कम खात्यास अदा केली जाणार नाही.

Leave a Reply