Corona : Madhuri Misal: Harshvardhan Patil:आमदार माधुरी मिसाळ, हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण!

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

आमदार माधुरी मिसाळ, हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण

पुणे : मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ  (madhuri misal) यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आमदार मिसाळ यांनी विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावली होती. तसेच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याना देखील कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन दोघांनीही केले आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर आमदार मिसाळ यांनी माध्यमांतून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांसह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच मास्कचा वापर करण्याचेही आवाहन केले जात आहे.

: हर्षवर्धन पाटील यांनाही लागण

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil tested corona positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी स्वत: समाज माध्यमाद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच पाटील यांच्या कन्या अंकिता यांचा निहार ठाकरे यांच्याशी मुंबई येथे विवाह झाला होता. या विवाह समारंभास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅमायक्रोनच्या प्रादुर्भावानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

Leave a Reply