PMC : Standing committee : आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ

Categories
PMC आरोग्य पुणे
Spread the love

आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ

स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

पुणे : कोरोना विषाणू संसर्गामुळे येणार्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग एक ते चार मध्ये सेवकांची एकूण मान्यता पदांची संख्या सोळाशे एकोणसत्तर इतकी आहे. मात्र केवळ आठशे ऐशी सेवक कार्यरत आहेत. म्हणजेच रिक्त पदांची संख्या सातशे एकोणनव्वद इतकी मोठी आहे. कोविड रुग्णालय आणि फ्ल्यू क्लिनिक सेंटरचा वाढता ताण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर येतो.’
रासने पुढे म्हणाले, ‘त्यामुळे कंरार पद्धतीने सेवेत असलेल्या बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ज्युनिअर नर्स, सेवक, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, दंतशल्यचिकित्सक अशा एकूण ७३ सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.’

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदकासाठी निधी

कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषानुसार खंदक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व करांसहित सुमारे तीन कोटी सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय रॉयल्टी आणि चाचणीचा खर्च अनुक्रमे ३४ हजार आणि ८४ हजार रुपये इतका होणार आहे.’

Leave a Reply