Fish Market | Market yard Pune | फिश मार्केटला स्थगिती देण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश!

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Fish Market | Market yard Pune | फिश मार्केटला स्थगिती देण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश!

Fish Market | Market Yard Pune | मार्केट यार्ड पुणे (Market yard Pune) येथील प्रस्तावित पोल्ट्री व फिश मार्केट (Poultry and Fish Market) चा प्रस्ताव रद्द करण्याबाबत सहकार,  पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अप्पर सचिव माधवी शिंदे यांनी राज्याचे पणन संचालकांना पत्र पाठवले आहे. सदर प्रकरणी पणन मंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती देण्यात यावी आणि प्रकरण तपासून सादर करावे असे निर्देश दिले आहेत.
आमदार माधुरी मिसाळ(MLA Madhuri Misal) यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून फिश मार्केट व पोल्ट्रीला विरोध केला होता. फडणवीस यांनी यासंदर्भात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना पोल्ट्री फिश मार्केट रद्द करण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार पणन विभागाने हे पत्र लिहिले आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील वाहनतळावर मच्छी मार्केट उभारण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करण्याची सूचना केली होती.
आमदार माधुरी मिसाळ यांनी हा विषय लावून धरला होता. या भागात दाट लोकवस्ती आहे, मच्छी मार्केटमुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. या परिसरातील नागरिकांचा मच्छी मार्केटला तीव्र विरोध असून, मी नागरिकांसोबत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनभावना पोहोचविल्या असून, त्यांनी मंत्री सत्तार यांना प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या.  असे मिसाळ यांनी सांगितले होते.