PMC : Meeting Minutes : बैठकांचे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार  : महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

बैठकांचे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार

: महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश

पुणे : महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या कडून वेगवेगळ्या विभागासोबत बैठका घेण्यात येतात. मात्र त्याचे इतिवृत्त वेळेवर दिले जात नाही. त्याला बराच कालावधी लागतो. यापुढे मात्र हे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार आहे. तसे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

: असे आहेत आदेश

महापालिका आयुक्त व  अति. महापालिका आयुक्त यांचे कार्यालयात मनपाच्या संबंधित विभागाच्या विविध विषयांबाबत बैठका आयोजित करण्यात येतात. सदर बैठकीस मंबंधित विभागाचे खातेप्रमुख व इतर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत असतात. तरी संबंधित कार्यालयाकडील विविध विषयांबाबत बैठका आयोजित करताना संबंधित विभागाकडील लघुलेखकाने बैठकीचे इतिवृत्त घेणेस उपस्थित राहून बैठकीस उपस्थितीत असणारे अधिकारी/कर्मचारी यांची स्वाक्षरी घेणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. तसेच संबंधित विभागाकडुन बैठकीचे इतिवृत्त बैठकीनंतर त्वरित तयार करण्यात येऊन बैठकीच्या अध्यक्षांच्या मंजूरीस्तव सादर करण्याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply