PM modi pune tour | मोदींचा पुणे दौरा वादात | मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा 

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

मोदींचा पुणे दौरा वादात | मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा

| राष्ट्रवादीकडून भाजपला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजे १४ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते देहू इथल्या तुकाराम मंदिराला भेट देणार असून तिथल्या शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. मात्र त्या आधीच हा दौरा वादात अडकला आहे.

मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक फलक लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टर्सवर पंतप्रधान मोदींचा फोटो विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोठा असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीका करत वारकरी सांप्रदायाचा अवमान केल्याची भावना व्यक्त केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात, “संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे. विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी.”