Buddha Jayanti | बुद्धजयंती निमित्त ‘नालंदा बुद्धविहारात’ कार्यक्रमांचे आयोजन

Categories
cultural पुणे
Spread the love

बुद्धजयंती निमित्त ‘नालंदा बुद्धविहारात’ कार्यक्रमांचे आयोजन

चतुश्रुंगी परिसरातील आनंद यशोदा सोसायटीतील “नालंदा बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी आयोजित करण्यात आलेल्या “बुद्धवंदना” कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे सचिव आयुष्यमान रमेश दुधगावकर यांनी भगवान गौतम बुद्ध तसेच डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जेष्ठ कार्यकर्ते सुभाष उबाळे यांनी सामूहिक वंदनेतर्गत “बुद्धवंदना”, म्हटली. त्यापाठोपाठ उपस्थितांनी सामूहिक बुद्धवंदना म्हटली,
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंडळाचे माजी अध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले की,भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनात व एकूणच बौद्ध धम्मात “पौर्णिमेला”,अनन्यसाधारण विशेष महत्व आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात जन्म ते मृत्यू या कालावधीत अत्यन्त महत्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत.

प्रामुख्याने वैशाखी पौर्णिमेला अलौकिक महत्व आहे,कारण राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांचा जन्म,राजकन्या यशोधरेचा जन्म,राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिनय, सम्बोधी (ज्ञानप्राप्ती ), आणि महापरिनिर्वाण,या अत्यन्त महत्वपूर्ण घटनांमुळे वैशाखी पौर्णिमेस अलौकिक महत्व आहे.
भगवान गौतमबुद्ध यांनी आपल्या जीवनात सत्य,तार्किकता,कारनभाव,
चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टिकोन,याला महत्व दिले तसेच दुःख,दुःखाचे कारण,दुखनिवारन,याकरिता आर्यष्टांगिक मार्ग याचे महत्व प्रमाण मानून मानवजातीला दुखमुक्तीचा मार्ग दाखविला आहे.
गौतमबुद्धांच्या धम्मउपदेशातून त्यांनी सत्याच्या कसोटीवर आपले सिद्धांत प्रमाण मानले. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी न्याय,बंधुता,एकात्मता,समानता,वैश्विक बंधुभाव आपल्या उपदेशातून दिले,त्यांच्या विचारधारेचा प्रभाव मानवकल्याणाचा असल्यामुळे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर “युद्ध नको,बुद्ध हवा”,याची निश्चित प्रचिती येते,त्यामुळे त्यांना ” विश्वशांतिदुत”,म्हटले जाते,असे संजय मोरे यांनी सांगितले.
नालंदा बुद्धविहारात विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून खऱ्या अर्थाने नालंदा बुद्धविहार हे समाजप्रबोधनाचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मा,दीपक सावंत,विनोद लोंढे,अशोक गायकवाड,सौ,नंदा सुभाष उबाळे,नामदेव गायकवाड,ज्ञानेश्वर बाबर,महादेव कांबळे,सुनील बनसोडे,डॉ, मनोज दुधगावकर,किरण दुधगावकर,किरण सरोदे,व अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते,तसेच परिसरातील नागरिक व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी,जनवाडी, गोखलेनगर ,औंध,पाषाण याभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिपक सावंत यांनी केले,
बुद्ध जयंतीनिमित्त उपस्थितांना “खिरदान”,करण्यात आले,

Leave a Reply