PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता 

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता

 

PCMC – Nigdi Metro | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Swarget -PCMC Metro) या मार्गीकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (PCMC – Nigdi Metro) होणे गरजेचे होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गासाठी पुणे मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवण्यात आला व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या (Pimpari chinchwad Municpal Corporation) मान्यतेनंतर राज्य व केंद्र शासनाकडे तो पाठवण्यात आला. महा मेट्रो (Maha Metro) तर्फे त्याचा पाठपुरा करून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याचा सतत पाठपुरावा चालू ठेवला, त्यामुळे आज  भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro New Route)

पुणे मेट्रो ने दिलेल्या माहितीनुसार या मार्गाची एकूण लांबी ४.४१४ किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग संपूर्णतः उन्नत असणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका असून या मार्गाचे काम ३ वर्षे ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

महा मेट्रोने हे काम जलद करण्यासाठी जनरल कन्सल्टन्सी नेमण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा आधीच काढल्या आहेत. लवकरच यांनी मार्गीकेच्या सिव्हिल, विद्युत आणि सिग्नल या कामासाठीच्या निविदा काढण्यात येऊन ठेकेदारांच्या नेमणूका करण्यात येतील व प्रत्यक्षात तीन ते चार महिन्यात कामाला सुरुवात होईल.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Maha Metro MD Shravan Hardikar) यांनी म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी हा विस्तारित मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील आणि या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होईल महा मेट्रो हे काम नियोजित वेळेत, ३ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण करेल.”