PMC Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | नवीन वर्षांपासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

Categories
Uncategorized
Spread the love

PMC Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | नवीन वर्षांपासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

 | वेतन आणि पेन्शन मिळण्यात येणार गती | वेतन आणि पेन्शन साठी एकच प्रणाली

| महापालिका प्रशासनाकडून सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरु

 

PMC Pay Roll and Pension Software | पुणे | महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना वेतन (Pay roll₹ आणि पेन्शन (Pension) हे ऑनलाईन प्रणाली द्वारे दिले जाते. मात्र ही सिस्टम फार जुनी झाली आहे. त्यामुळे महापालिका आता नवीन सॉफ्टवेअर विकसित करत आहे. त्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन साठी रखडत बसावे लागणार नाही. याला आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग (PMC Education Department) देखील आता यामध्ये जोडण्यात आला आहे. जानेवारी पासून यांची सुरुवात करण्यात येईल. अशी माहिती संगणक विभाग प्रमुख राहूल जगताप (System Manager Rahul Jagtap) यांनी दिली. (PMC HRMS Pay Roll and Pension System) 

याबाबत जगताप यांनी सांगितले कि, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation)
जगताप यांनी सांगितले कि, pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे. यामुळे आता वेतनासाठी जी 10 तारखेची वाट पाहावी लागते. ती पाहावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळेल. तसेच आज पेन्शनसाठी सेवानिवृत्त सेवकांना रखडावे लागते, ती अडचण देखील कमी होणार असून लवकरात लवकर पेन्शन हातात मिळण्यास मदत होणार आहे. जगताप यांनी सांगितले कि, हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी महापालिकेला बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने सीएसआर (CSR) अंतर्गत चांगली मदत केली आहे. या प्रणालीचा वापर करण्यास आम्ही प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. मात्र पूर्ण प्रणाली ही जानेवारी महिन्यापासून विकसित होईल.
—-