PMC School : पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी जाणार अमेरिकेत 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे
Spread the love

पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी जाणार अमेरिकेत

: अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलचा शैक्षणिक प्रयोग हा आदर्श मॉडेल आहे. शाळेतील विद्यार्थी तसेच  शिक्षक यांचे शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत येथील विद्यार्थी अमेरिकेमध्ये व अमेरिकेतील विद्यार्थी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमध्ये काही दिवसाचा शैक्षणिक दौरा करतील.  यासाठी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूलची निवड करण्यात आली असून तसा  प्रस्ताव तयार करून  असे प्रपोझल मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहे  असे उद्गार अमेरिकेच्या मुंबईतील  कॉन्सलेट जनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स  कॉड़ी एतलें यांनी आज काढले.

महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल ही भारतासह अमेरिकेत देखील प्रसिद्ध  असून अमेरिकेतून आलेल्या ३० शिक्षकांच्या गटाने दिलेला शाळेचा रिपोर्ट आधारे अमेरिकेच्या मुंबईतील  कॉन्सलेट जनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स  कॉड़ी एतलें यांनी आज शाळेला भेट दिली. पुणे महानगरपालिकेतील काँगेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी त्यांचे स्वागत केले.

आबा बागुल व कॉड़ी एतलें यांच्यात चर्चा झाली असून आर्थिक दुर्बल घटकातील व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने सुरु केलेल्या या शाळेने गेल्या १२ वर्षात  घेण्यात आलेले विविध  उपक्रम, शाळेची गुणवत्ता, १०० टक्के निकालाची परंपरा तसेच शाळेतील विद्यार्थी ते नासमध्ये काम करण्याची संधी,इंजिनिअर, स्पर्धा परीक्षेतून आयपीएस होण्यापर्यंत विविध क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी काम करत आहेत.शाळेतील ५०० विद्यार्थी आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच शाळेत विद्यार्थ्यांवर विशेष शैक्षणिक लक्ष देण्यात येत असून रोजचा अभ्यासक्रम,  क्रीडा व इतर घेतले जाणारे उपक्रम, बुद्धिमत्ता टेस्ट अश्या विविध प्रकारच्या संदर्भात सविस्तर माहिती आबा बागुल यांनी दिली.

राजकीय व्यक्तीने पुढाकार घेऊन अश्या पद्धतीने आणि तेही महानगरपालिकेच्या माध्यमातून अश्या प्रकारची शाळा उभारणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.  यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्याचा चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे,त्यांनी शाळेचे गेल्या १२ वर्षांचे  रिझल्ट अभ्यासले ते दरवर्षी १०० टक्के आहेत ते देखील कौतुकास्पद आहेत. अशी अभ्यासाबरोबरच इतर सुख सोइ देणारी शाळा  सुरु केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व पुणे महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. या शाळेशी एक्सचेंज प्रोग्रॅम संदर्भात लवकरच पत्र व्यवहार करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल अश्विनी थेट व शिक्षक उपस्थित होते.

आबा बागुल यांनी त्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले व  या एज्युकेशनल  एक्सचंगे प्रोग्रॅमचा मी पाठपुरावा करून  पुणे महानगरपालिका ,राज्य व केंद्र शासनाची मान्यता, विद्यार्थ्यांची निवड, सोबत जाणाऱ्या शिक्षकांची निवड, सर्वांचे पासपोर्ट विझा तसेच विमान प्रवास तेथील सर्व खर्च या संदर्भात तपशीलवार प्रकल्प तयार करून  एक्सचेंज  प्रोग्राम  अंतर्गत राजीव गांधी अकॅडमी  ऑफ इ  लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आबा बागुल म्हणाले

प्रिन्सिपल अश्विनी थेटे यांनी आभार मानले.

One reply on “PMC School : पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी जाणार अमेरिकेत ”

Leave a Reply